रिपाइं एकतावादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेशाध्यक्षपदी विकास निकम यांची फेरनिवड झाली आहे. आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास ठाण्यात रिपाइं एकतावादी पक्षाची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय झाला. तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली.