राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे राज्याभरात गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरु आहे. परंतु, त्यांच्या मागण्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे त्यांच्यावर आज भर पावसात थाळीनाद आंदोलन करण्याची वेळ आली. जनतेचे आरोग्य सांभाळणार्या अधिकारी कर्मचार्यावर पावसात आंदोलन करुन स्वतःचे आरोग्य धोक्यात टाकण्याची वेळ आली. परंतु, बुधवार दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी दु. 4 वा. सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट दिली.