बार्शीचे आयएएस अधिकारी रमेश घोलप शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीत त्यांनी आपला ३ महिन्यांचा पगार म्हणजेच तब्बल ५ लाख रुपये मदत म्हणून जाहीर केले. या मदतीच्या पहिल्या टप्प्यात घोलप यांनी आत्महत्या केलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये थेट घरी जाऊन सुपूर्द केले. उर्वरित रक्कमेतून २५ ते ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती ३० रोजी दुपारी ४ च्या सुमारास दिली आहे.