बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात आज 2 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता शहराच्या प्रमुख मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. आगामी सण उत्सव ईद-ए-मिलाद व गणपती विसर्जन मिरवणूक संबंधाने या रूट मार्च आयोजन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते.सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखतील असे वर्तन करू नये, आगामी सण उत्सव शांततेत साजरे करावे अशा सूचना देत हा रूट मार्च नांदुरा शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आ