माझ्या मावळ तालुक्यातील परिश्रमी शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी यांचे सारे दुःख, विघ्न, क्लेश व पीडा तू दूर कर. तुझ्या कृपेने प्रत्येक घर आनंदाने भरून जावो, प्रत्येक चेहऱ्यावर समाधान उमलावं आणि सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी आयुष्य लाभावं, अशी प्रार्थना मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी गणराया चरणी केली.