जिवंतपणी संघर्ष, मृत्यूनंतरही हेळसांड; रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार कोळगाव ता.निफाड येथील स्व.प्रकाश दत्तात्रय घोटेकर (वय ३९) यांचे दि.२३ ऑगस्ट रोजी रात्री ९.४५ वाजता दुर्दैवी निधन झाले. मात्र स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उपलब्ध नसल्याने अंत्ययात्रा रखडली व मृतदेह १४ तास घरातच ठेवावा लागला. त्यामुळे रस्त्यासाठी जिवंतपणी संघर्ष... मृत्यूनंतरही हेळसांड!' अशा शब्दांत कोळगावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी संताप व्यक्त केला