उदगीर शहरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली होती, दोन दिवसांपूर्वी चौबारा परिसरात कुत्र्यांच्या झुंडीने व्यापाऱ्यांवर हल्ला करून व्यापाऱ्यांच्या ओठाचे लचके तोडले होते या घटनेमुळे उदगीर शहरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला होता, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली होती, अखेर नगरपालिका प्रशासनाने १२ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजल्या पासून उदगीर शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्याची नगरपालिका मोहीम सुरू केली आहे.