हिंगणघाट :उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या अंधारम्य प्रकारामुळे येथील दुराअवस्थेत चवाट्यावर येत रुग्णालय स्वताच रुग्ण असल्याचा प्रकार उघडकीस आला.याची तात्काळ दखल घेऊन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी याठिकाणी आरोग्य उपसंचालक शशिकांत शंभरकर यांना बोलावून संपूर्ण रुग्णालयाच्या तब्येतीचा आढावा घेतला.व शुक्रवारी झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त करीत येथे निर्माण झालेल्या अवस्थेतस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार यापुढे असे खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.यावेळ आरोग्य व इतर अधिकारी उपस्थित होते