उदगीर तालुक्यातील बोरगावला पुन्हा पुराचा तडाखा बसला असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, नदीचे पाणी गावात शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे,गेल्या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी रात्रभर झालेल्या पावसामुळे बोरगावत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते,अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती तर अनेक जनावरे मृत्यू पावली होती,शेतीचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, पुन्हा २७ ऑगस्ट रोजी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे बोरगावत पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.