उमरखेड तालुक्यातील चिंचोली (संगम) गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने ५ ते ६ दिवसापासून ग्रामस्थांचा संपर्क तुटून गावामध्ये पाणी शिरल्याने परिणामी अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. पिण्यासाठी असलेल्या विहीर, बोअरवेलमध्ये पुराचे पाणी जाऊन दूषित झाले असून त्यातच चिंचोली ग्रामपंचायतिचे वॉटर फिल्टर हे गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडल्याने नाईलाजास्तव गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.