उदगीर तालुक्यातील बामणी पाटी जवळ औषध घेवून जाणारा ट्रक पेटल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर तालुक्यातील बामणी पाटी जवळ उदगीर हैद्राबाद मार्गावर कीटकनाशके औषध घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली,या आगीत ट्रक मधील कीटकनाशक औषधे व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.