ठाणे पोलिसांकडून रस्ते सुरक्षाबाबत नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. “विकसित भारतासाठी सडक सुरक्षा – जीवन रक्षा” असा हा उपक्रम असून आज दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने एक चित्रफीत तयार करून माहिती दिली आहे. दैनंदिन जीवन सुरक्षित करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभिनेता श्रेयस तळपडे आणि ठाणे पोलिस आयुक्तालयाचे पोलिस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.