इंदरमारी (ता. आष्टी) येथे पार पडत असलेल्या उर्स निमित्त विधानपरिषद आमदार मा. दादाराव केचे यांनी आज रात्री दर्ग्याला भेट दिली. दर्ग्यावर चादर अर्पण करत आपली श्रद्धा व्यक्त केली. या कार्यक्रमात मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार दादाराव केचे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक एकतेचा संदेश देत, सर्व धर्मामध्ये बंधुत्वाचे नाते जपण्याचा महत्त्वाचा संदेश दिला.. रात्री दहा वाजता कव्वाली ला सुरुवात झाली...