आज दि 9 सप्टेंबर सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील अयोध्यानगरात किरकोळ कारणावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडी लावण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती प्राप्त होत असून रोहन आदिक नावाच्या आरोपीने मित्रांना बोलावून थेट महिलेच्या घरात घुसून मारहाण केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. आईला मारहाण होत असल्याचे बघून मुलीने आरोपींना भिडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी तिलाही धक्काबुक्की केली. यात यात महिला जखमी झाली