दौंड शहरातील रेल्वे वसाहतीमधून एक दुचाकी वाहन चोरीस गेले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही चोरी झाली आहे.याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, रेल्वेच्या कामांसाठी हंगामी मजूर म्हणून काम करणारे आकाश मोतीराम पवार यांची होंडा कंपनीची सीडी ११० ड्रीम मॉडेल असलेली दुचाकी ११ सप्टेंबर रोजी चोरीस गेली आहे.