गेल्या आठवड्यात अमळनेर तालुक्यातील कळमसरे आणि वासरे या दोन गावांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट कोसळले. अचानक आलेल्या पुरामुळे येथील आदिवासी वस्तीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे संसारोपयोगी वस्तू आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. तातडीच्या मदतीची गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शनिवारी 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता 'सेंटर फॉर ॲग्रीकल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंट (कार्ड) जालना' आणि 'साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर' यांनी संयुक्तपणे या पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.