राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून आदरांजली वाहिली.