शहरालगत खर्दे येथील परिसरात समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याच्या भावनेतून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.सामान्यतः वाढदिवसाचे औचित्य साधून फुलांचे गुच्छ,सत्कार, केक कापण्याची परंपरा पाहायला मिळते.मात्र, सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष अरुण धोबी यांनी त्याला छेद देत एक वेगळा आणि स्तुत्य मार्ग स्वीकारला.आणि गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवून त्यांनी आपला वाढदिवस संस्मरणीय केला.