उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आल्याने पंढरपूर शहराला बसणारा पूराचा धोका टळला आहे. आज शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता अशी स्थिती स्पष्ट झाली. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या पाऊस ओसरल्याने धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे.