जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधी ते तरसोद दरम्यानच्या नवीन राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी 27 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला असून, इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर क्लीनर थोडक्यात बचावला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, बचावकार्य करण्यासाठी जेसीबी आणि क्रेनची मदत घ्यावी लागली.