खंडणी वसुलीचा व्यापाऱ्यांना त्रास; आंदोलनाची चेतावणी संगमनेर : शहरातील व्यापाऱ्यांना अन्न-औषध प्रशासनाच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप व्यापार्यांनी केला आहे. अनावश्यक कारवाया व खंडणीवसुलीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून, यापुढेही हा त्रास सुरू राहिल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका व्यापार्यांनी जाहीर केली आहे. आज दुपारी दोन वाजता व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी मंडळाने प्रांत अधिकारी तसेच आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.