दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रखर सामाजिक कार्यकर्त्या सोनाली भोसले यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्ष (युवती विभाग) म्हणून नियुक्ती केली आहे. सोनाली भोसले यांच्या प्रामाणिक कार्यपद्धती, नेतृत्वगुण आणि भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिकेमुळेच त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.