महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेने जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्या सशस्त्र दलांसाठी 'सिंदूर' रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे याचा मला आनंद आहे. आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्यांसाठी अशा प्रकारचे रक्तदान शिबिर आपल्या देशात पहिल्यांदाच आयोजित केले जात आहे.