पालघर जिल्ह्यातील तारापूर उद्योग क्षेत्रातील आरती ड्रग्स कंपनीत हायड्रोक्लोरिक अल्म बाहेर पडून हवेत पसरल्याने वायुगती झाली. परिसरातील नागरिकांना डोळे चूरचूरणे घसा खवखवण्यासारखे त्रास जाणवू लागले. अग्निशमन दल, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ उपायोजना केल्यामुळे वायुगर्तीवर नियंत्रण मिळवण्यात आले व परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही.