महानगरपालिकेच्या गंज बाजार, सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग, प्रोफेसर चौक, सावित्रीबाई फुले फेज १ व फेज २, भाग्योदय - बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता मध्य शहरातील बाजारपेठेत असलेल्या जुना दाणे डबरातील ५२ गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. गाळेधारकांकडे २.०७ कोटींची थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेतले जातील, असा इशारा दिला