कारली येथील सुरेश भाऊ ठाकरे यांचे शेतामधील विहिरीत पडलेल्या घोणस जातीच्या सापाला दिनांक 31 जुलै रोजी दुपारी सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिले. घोणस जातीचा साप गेल्या काही दिवसा पासून विहिरीत अडकलेला होता. सदर घटनेची माहिती दत्ता डुकरे, समाजसेवक गजानन करडे, गजानन अवताडे, गोपाल मडामे यांनी सर्प मित्र स्वराज गेडाम, खुशाल राठोड यांना देऊन त्यांना कारंजा येथून बोलावून घेतले व सदर सापाचा जीव वाचवला. सदर सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.