पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका 64 वर्षीय महिलेला लक्ष्य करून तब्बल साडे 15 लाख रुपयांचे सोने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सर्व 155 ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.शांतीनगर निवासी शकीरा ताहिर गोहर या 25 ऑगस्ट रोजी दुपारी तहसील परिसरातील सराफा बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या.