मुळशी धरण भागातून जाणा-या पुणे-कोलाड रस्त्यावर चाचीवली (ता.मुळशी) येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. शुक्रवार(ता.२९) सकाळी ८.३० वाजण्याचे सुमारास हा अपघात झाला.या अपघातात सुमारे १० ते १५ प्रवासी, चालक मुक्कामार लागून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.