सातारा येथील आ.मकरंद आबा पाटील यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे परंतु त्यांना येण्या जाण्यासाठी 2 दिवस लागतील आणि ते जिल्ह्यासाठी किती लक्ष देतील?कालच राज्य सरकारने सह पालकमंत्री म्हणून संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे सह पालकमंत्री म्हणून नियुक्त केले परंतु सह पालकमंत्री हा घटनेत बसणारा पद नाही, आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी ही ॲडजस्टमेंट असल्याची टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज 26 ऑगस्टला सकाळी केली आहे.