शिरवळ पोलीस ठाण्यात दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता धार्मिक भावना दुखावल्याचा एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची फिर्याद हवालदार दत्तात्रय शंकर धायगुडे वय ५४ यांनी दिली आहे. न्यू कॉलनी येथील एकाले टिपू सुलतानची बॅकग्राऊंड धून देवून त्यावर पाकिस्तानाचा झेंडा ठेवून तो व्हिडीओ सोशल मीडियावर स्टोरी ठेवला होता. समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला असून याचा तपास पोलीस निरीक्षक नलावडे हे करत आहेत.