बार्शीतील कासारवाडी रोड परिसरात बारावीचा विद्यार्थी आदित्य संतोष जोशी वय वर्ष १८ याने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या वेळी त्याचे आईवडील नातेवाइकांकडे गेले होते. लहान भावाला घराबाहेर पाठवून त्याने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.