भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त आम्ही साकारलेले ५२ फुट उंचीचे हुबेहुब काशी विश्वेश्वर मंदिर पाहून विशेष कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.