अकोला शहरातील गुलजारपुरा भागात भोई समाजातील गरीब कुटूंबातील 13 वर्षाच्या बालीकेवर पाशवी अत्याचार करणार्या तोहीत समर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल वाशिमच्यावतीने दि. 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.