दि. 7 सप्टेंबर रोजी रात्री वाशिमच्या आकाशामध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसले. या वर्षातील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. खंडग्रास चंद्रग्रहण रात्री 9:57 वाजता सुरु होवून दि. 8 सप्टेंबरच्या रात्री 1:26 वाजता समाप्त झाले. तसेच खग्रास चंद्रग्रहण रात्री 11 वाजता सुरु होऊन दि. 8 सप्टेंबरच्या रात्री 12:22 वाजता समाप्त झाले.. खंडग्रास स्थितीमध्ये चंद्राचा काही भाग झाकला होता तर खग्रास स्थितीमध्ये चंद्राचा पूर्ण भाग झाकला गेला होता. अस असलं तरी खग्रास स्थितीमध्ये चंद्र लाल रंग दिसला.