बुलढाणा शहरात महानुभव पंथाचे प्रवर्तक, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिन महोत्सवा निमित्त २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोपाल आश्रमाचे संस्थापक आचार्य, महंत प.पू श्री.लोणारकर बाबा महानुभाव यांच्या मार्गदर्शनात भव्य शोभायात्रा मिरवणूक आयोजित केली जाते.शोभायात्रे प्रसंगी धाड नाका येथे भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उपस्थित राहून शोभायात्रेचे स्वागत केले.