राज्यभरातील सर्वच सरकारी विभागातील कंत्राटदारांचे शासनाकडे दहा महिन्यापूर्वी विविध कामे पूर्ण केल्यावर ही देयकापोटी 89 हजार कोटी रुपये थकले आहे वारंवार मागणी केल्यावरही पैसे मिळत नसल्याने शेवटी कंत्राट दादांनी नागपुरातील संविधान चौकात एकत्र येत आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजता च्या दरम्यान सामान्य नागरिकांकडे भीक मागितली. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम ग्राम विकास जलजीवन मिशन व इतर विभागांमध्ये कंत्राटदारांकडून कोट्यावधीची कामे करण्यात आली.