बळीराजासोबत शेतात राबणारा बैल हा त्याचा खरा सवंगडी असल्याचे प्रतिपादन आ. अमित झनक यांनी दि. 22 ऑगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक येथे बैल पोळा सण साजरा करताना केले. त्यांनी यावेळी बैलांची पुजा करुन बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी गावकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.