पश्चिम रेल्वेच्या बोईसर आणि वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने डाऊन मार्गावरील वाहतूक टप्पे झाली असून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. उपनगरीय रेल्वे सेवा त्याचप्रमाणे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील याचा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेकडून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.