काल रात्रीपासून सूरू झालेल्या मुसळधार पावसामूळे आलापल्ली–भामरागड राष्ट्रीय महामार्गावरील पर्लकोटा नदीवरील पुलावर पाणी चढले होते. परिणामी आज पहाटेपासून येथील वाहतूक ठप्प झाली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या आणि अनेक खाजगी वाहने भामरागड शहरात अडकून पडली होती अखेर १३ तासानंतर आज दि.२८ सप्टेबंर रविवार रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नदीचे पाणी खाली उतरल्याने वाहतूक अखेर सुरळीत पूर्ववत सुरू झाली.