शनिवार दि. 23 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता पासून रामटेक शहरातील प्रत्येक वार्डात ठिकठिकाणी लाकडी बैलांचा तान्हा पोळा बालगोपालांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. उत्कृष्टपणे सजवलेले नंदीबैल तसेच विविध वेशभूषेत सजलेले बैलधारक आकर्षणाचे केंद्र होते. शहरातील राधाकृष्ण- शास्त्री वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तान्हा पोळ्यात राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. नगरपरिषद प्रशासिका पल्लवी राऊत,ठाणेदार रवींद्र मानकर हे अतिथी म्हणून उपस्थित होते.