पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखाना हा भाड्याने देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा सुरू असून याबाबत वाखरी येथे आज सभासदांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखाना हा आमच्या सभासदांचा आहे. त्यामुळे सहकार शिरोमणी साखर कारखाना हा भाड्याने देऊ देणार नाही, त्याचबरोबर जो कोणी हा साखर कारखाना भाड्याने घेणार आहे त्याला पंढरपूर येथे पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा एडवोकेट दीपक पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.