चिचगड पोलीसठाणे अंतर्गत येणाऱ्या जेठभावडा येथील प्रमिला मडावी या बहिणीला आरोपी प्रल्हाद पुराम याने मुसळाने मारून गंभीर जखमी केल्याची घटना 9 मे रोजी सकाळी 9 वाजता घडली आरोपी प्रल्हाद पुराम हा दारू पिण्याच्या सवयीचा आहे तो 9 मे रोजी दारू पिऊन बहिणीला 300 रुपयांसाठी भांडण करू लागला त्यांनी आपल्या बहिणीला मोटरसायकलमध्ये ऑइल टाकले त्याचे 300 रुपये दे म्हणत होता सायंकाळी पैसे देणार असे बहिणीने म्हटले असताना आरोपीने तिच्याशी वाद घालून शिवीगाळ करीत मुसळाने पोटावर डोक्यावर मारून गंभीर जखमी केले