पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धनसळ येथे दिनांक 22 ऑगस्ट रोजी ऊस तोडीचे पैसे मागण्याच्या कारणावरून तीन जणांनी संगणमत करून भीमराव जाधव यांच्यासोबत वाद घालत काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी 23 ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.