होळ, तालुका फलटण जिल्हा सातारा येथील लक्ष्मी नंदू भोसले यांचा मुलगा, शेखर नंदू भोसले याला वडगाव येथील कॅनल मध्ये हातपाय बांधून मारून टाकण्यात आले असल्याचा संशय, भोसले कुटुंबीयांनी केला असून, ही घटना दिनांक आठ ऑगस्ट रोजी घडली आहे,तरी देखील आज अखेर मारेकऱ्यांचा शोध लागला नाही, यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे, या घटने संदर्भात भोसले कुटुंबीयांनी घातपात झाला असल्याचे संशय व्यक्त केला आहे.