सेवादासनगर येथील युवक मृत्युंजय राजेश राठोड ( वय २३ ) हा दि ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गणपती विसर्जन करण्यासाठी अरूणावती नदी तीरावर गेला असता नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. सविस्तर असे की, तालुक्यात रविवारी गणेश विसर्जनाची तयारी सुरू असताना तालुक्यातील सेवादासनगर येथील गणेश मंडळ विसर्जनासाठी भक्तिभावाने गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी अरूणावती पात्रात पोहोचले असता गावातील अविवाहित युवक (Youth Death) मृत्युंजय राठोड हा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली.