राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचार्यांची सेवा दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त झाली आहे. अशा कर्मचार्यांना नियमित करण्यात यावे व 10 वर्षा आतील कर्मचार्यांच्या 30 टक्के जागा नियमित करण्यात याव्यात या व इतर महत्वाच्या मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर तिन दिवसापासून सुरु असलेले आंदोलन आजही सुरुच होते. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती मंगळवार दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता आंदोलकांनी दिली.राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आंदोलन सुरु आहे.