चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पाचगाव येथील एका विधवा महिलेचे घर कोसळल्याने त्यांचे या घटनेत घरातील साहित्य संपूर्ण नष्ट झाल्याने लाखो रुपयांची नुकसान झाल्याची घटना आज दिनांक 2 सप्टेंबरला सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.शासनाने याकडे लक्ष देऊ सदर विधवा महिलेला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.