गडचिरोली, दि. २९ : केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले असून या अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा वैयक्तिक व सामूहिक लाभ पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यंत्रणेने सकारात्मक व समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत श्री पंडा बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार