कळवण तालुक्यातील नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 102 रुग्णवाहिकेमध्ये रुग्णासोबतच मोटरसायकल ही वाहतूक करताना सामाजिक कार्यकर्ते यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी संपर्क साधला असताना संबंधितांना नोटीसा देऊन कार्यवाही करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.