हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी शहरातील बिडकर कॉलेज मध्ये २९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यामध्ये २ हजारा पेक्षा जास्त पदाकरितादहावी, बारावी, पदवी, पदविका, अग्रीकल्चर पदवी, पदविका इंजिनिअरिंग, आय.टी.आय. इत्यादी सर्वप्रकारच्या पात्रता धारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.